सर्व काही ठीक आहे?

(थोडा उशीर झाला सांगायला….)
सत्य
नकारात्मक वाटतंय….
मग काय
खोटं खोटं
वागायचं का?
की
डोळेझाक
करायची?
– अरे तुला
झालंय काय?
– सर्व काही
ठीक आहे!!?
असत्यालाचं
जर
सत्य मानले
तर
सर्व प्रश्न
सुटतील का?
की
गुंता
आणखी वाढेल.
– तू खुप विचार
करतोस…
– सर्व काही
ठीक आहे!!?
दुर्लक्ष
करायचं का?
पण
आपल्या
बाबतीत
असं घडलं तर..
– जाऊ दे
एवढा विचार
कशाला करतोस?
– सर्व काही
ठीक आहे!!?
उगीचच
त्रास,
त्रागा,
मनस्ताप..
डोक्याला ताप
– त्यांचं ते
बघून घेतील
– सर्व काही
ठीक आहे!!?
उद्या पूर्वेला
पश्चिम म्हणतील
दिवसाला
रात्र म्हणतील
– आपलं
काय जातंय?
– सर्व काही
ठीक आहे!!?
स्तुती जर
सत्य असेल
तर
टीका ही
कट
मानायचा का?
– आता बंद
कर हा हे…
– सर्व काही
ठीक आहे.
(बरं झालं लवकर सांगितलं.)

ओंकार

०४/०६/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *