मूर्ख म्हणतो दुसऱ्याला,
पण गंमत बघा,
स्वतः काही शहाणा नाही !!
रोज रात्री
फुकटचा सल्ला जगाला,
जे माझ्याबाजूचे ते शहाणे
बाकी सर्व मूर्ख,
महामुर्ख
अतिमहामुर्ख ……
मी म्हटलं
का बरं आम्ही मूर्ख?
म्हणे तुम्हाला
स्वाभिमान नाही.
साधा प्रश्न….
कशाचा?
तर चिडला राव…
म्हणतो,
तुझं कठीण आहे.
हो रे बाबा…..
ठीक आहे.
आता तरी सांग,
का बरं आम्ही मूर्ख?
म्हणे आपणावर
संकट आहे….
आणि तुला त्याची
जाणीव नाही.
संकटावर उपाय काय?
चल चर्चा करू…
तर म्हणतो,
चेष्टा करायची नाही.
चल मी गप्प राहतो,
तू बोल….
तर म्हणतो,
बोलावे लागले
तर उपयोग नाही.
(जाणीव हवी परिस्थितीची)
अरे तुझी अडचण काय?
तर म्हणे,
भूतकाळ विसरलात…
म्हटलं कोणता?
तर म्हणतो
बघा !! सांगावं लागतंय….
मी तर हारचं मानली.
म्हटलं तू तेवढा शहाणा….
तर हातघाईवरच आला
तुमच्या सारखे आहेत
म्हणून त्यांचं फावत…
मी म्हंटल कोणाचं?
गडी चिडला….
म्हणतो कसा…
डोक्यावर पडला काय?
मी म्हटलं
तूच झोप आता…!!
तेल घालून डोक्यात..
तर म्हणतो,
तेच तेल पाठीला लावून
चोप काढीन चांगला…
तुला कळत नाही का?
मी शहाणा आहे…
अरे मी मघाशी
हेच सांगत होतो.
तर म्हणतो…..
तू नाय सांगायचं
तू कोण ठरवणारा?
मी तर आवाज आहे!!
(माझा प्रश्न)
कोणाचा?
मी विचारतो
तुमच्या वतीने,
(माझा प्रश्न)
काय?
तर चिडला,
आणि म्हणाला
यांना बाहेर काढा….
कानाला खडा
पुन्हा या शहाण्यांच्या
वाटेला जायचं नाही.
कारण त्यांनी
आधीच ठरवलंय
समोरचा मूर्ख आहे.
आणि हे शहाणे
गर्दीत पण,
सहज ओळखता येतात.
आणि
सोशल मीडियाच्या
वॉलवर सुदधा…..
एकचं डीएनए
आहे सगळ्यांचा!!
काही कळत नाही?
एवढ्या जणांचा
डीएनए सेम कसा.
अरे हा…..
एकाच ठिकाणी
मेंदू गहाण
ठेवलाय ना…
मग बरोबर
चला…
एकदाची
बडबड संपली.
चॅनेल बदला…..
ओमकार
०४/०८/२०२०